Saturday, 12 July 2014

नकळत सारे घडले..

हृदयाचे ठोके वाढत गेले...
मन माझे गडबडले..
ती येताच, तिला पाहताच...
नकळत सारे घडले..

स्पर्श तिचा होताच मला...
स्वर्ग पृथ्वीवर अवतरले...
त्याच स्पर्शातून कळले सारे..
शब्दांच्या पलीकडले..

नजरेला नजर मिळूनी तिची...
सूर असे बहरले...
धुंदीत बुडुनी ऐकू आले...
सुरांच्या पलीकडले...

हास्य असे कि पाउस पडुनी...
भिजताना शरीर थरथरले...
नाजूक ओठात शोधत बसलो...
ओठांच्या पलीकडले....

-Viraj V. Baraskar
© 2014 FWA

No comments:

Post a Comment