Wednesday, 2 July 2014

खऱ्या प्रेमाची गोष्ट

(प्रेमा तुझा रंग कसा? ह्या प्रश्नच उत्तर हवं असल्यास आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडून पहा. कदाचित आयुष्यातली सर्वात 'गिरी हुई' हरकत म्हणजे प्रेमात 'पडणे'. पण जर प्रेम एकतर्फी असेल तर? प्रेमात सादाला प्रतिसाद मिळाला नाही तर? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आहेत प्रस्तुत कवितेत....नक्की वाचा)

प्रेम
दिल्यानंतर ते परत मिळावं....
म्हणून ते करायचे नसतं...
नाही मिळालं ते परत जरी..
प्रेम विसरून हरायचं नसतं...

सादाला
प्रतिसाद मिळाला नाही....
आपण त्या भावनांना जपायचं असतं..
खरं प्रेम असेल जर...
हसता हसता तिच्या समोर यायचं असतं....

तिच्यावर आपलं प्रेम आहे जाहीर करून...
इथे तिथे मिरवायचं  नसतं...
तिला प्रेमात शोधता शोधता...
प्रेमाच्या स्वप्नात हरवायचं असतं...

तिचं आपल्यावर प्रेम नाही...
म्हणून तिला विसरण्याची रीत नसते...
प्रियेसाठी काहीही करण्यातच तर...
प्रियकराची प्रीत असते...

भावना खऱ्या असल्या जर...
कधीतरी नक्कीच मनासारखं घडेल...
आणि तुमची 'ती' तुमचं प्रेम पाहून...
नक्कीच तुमच्या प्रेमात पडेल...

-विराज वि. बारस्कर
© 2014 FWA

No comments:

Post a Comment