(मी पाहिलेली स्वप्नांची नगरी....)
गरीब जिथे फुटपाथवर
दुकान टाकतो....
रोडवर चालणारा प्रत्येकजण आपल्या बापाचा असल्याचं वागतो...
लवकर निघूनही जिथे उशिरा पोहोच्याची घाई दिसते....
कळलं का भाऊ...
आपली मुंबई ही अशीच असते....
रिझर्वेशन नसूनही सीट जिथे
फिक्स्ड असते....रोडवर चालणारा प्रत्येकजण आपल्या बापाचा असल्याचं वागतो...
लवकर निघूनही जिथे उशिरा पोहोच्याची घाई दिसते....
कळलं का भाऊ...
आपली मुंबई ही अशीच असते....
चौथी सीट ऐन गर्दीत स्वीट असते...
हेन्गिंग गार्डनच्या टोकावरून स्वप्नांची नगरी भासते.....
कळलं का भाऊ...
आपली मुंबई ही अशीच असते...
कितीही पैसे कमावले
तरी आपलं कधी
भागत नाही....
गरज असल्यावर कोणीही कोणाशी वाईट वागत नाही....
वेळ म्हणजेच पैसा जिथे रीत असते....
कळलं का भाऊ....
आपली मुंबई ही अशीच असते...
गरज असल्यावर कोणीही कोणाशी वाईट वागत नाही....
वेळ म्हणजेच पैसा जिथे रीत असते....
कळलं का भाऊ....
आपली मुंबई ही अशीच असते...
डब्यात कालची भाजी जिथे
ताजी असते...
पुरुषांना उठवून एखादी बाई लेडिज-सीट वरच बसते...
प्रत्येकाच्या रुदायाचा ठोका, प्रत्येकाची जी प्रीत असते....
कळलं का भाऊ...
आपली मुंबई ही अशीच असते...
पुरुषांना उठवून एखादी बाई लेडिज-सीट वरच बसते...
प्रत्येकाच्या रुदायाचा ठोका, प्रत्येकाची जी प्रीत असते....
कळलं का भाऊ...
आपली मुंबई ही अशीच असते...
-विराज वि. बारस्कर
© 2014 FWA